समय है एक होने का, न मतभेदों में खोने का ।

संघसंचलनाने गजबजले नाशिक, २१ ठिकाणी संचलन उत्साहात

    14-Oct-2024
Total Views |

RSS

 
नाशिक : ( Rashtriya Swayamsevak Sangh )राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्त्वाच्या सहा उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमीचे औचित्य साधत रा. स्व. संघातर्फे शहरातील सहा गटांतील एकूण २१ नगरांमध्ये पथसंचलन मोठ्या उत्साहात पार पडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपारिक गणवेशात सदंड-सघोष संचलनात हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले. संचलनामध्ये घोष (बॅन्ड), जीप /चारचाकी वाहन, भगवा ध्वज व सदंड रक्षक हे वेगळे वैशिष्ट्य ठरले. परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने संचलन मार्गावर रांगोळ्या काढल्या. तसेच भगवा ध्वज व स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करत स्वागत केले.
 
 
नाशिकरोड गट
 
जेलरोड उपनगर
 
व्हिजन अकॅडमी, शिवराम नगर येथून सकाळी ७:३० वाजता संचलनाला सुरूवात झाली. पुढे टाकळी रोड-श्रीराम नगर-लोखंडे मळा भाजी मार्केट-रुक्मिणी नगर-हनुमंत नगर-चैतन्य नगर-पुष्पक नगर-टाकळी रोड-आढाव मळा मार्गे व्हिजन अकॅडमी-शिवराम नगर येथे समारोप झाला. नाशिकरोड गट सहकार्यवाह, जेलरोड उपनगरचे कार्यवाह, सहकार्यवाह यांच्यासह एकूण ६० स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
 
मुक्तीधाम नगर
 
सकाळी ८ वाजता के. जे. मेहता हायस्कूल येथून संचलनाला प्रारंभ झाला. धूम्रवर्ण गणपती मंदिर-तुळजा भवानी मंदिर-भगवती माता मंदिर-मनाली पार्क गार्डन-माणिक नगर-विजय नगर-माधव लॉन्स मार्गे पुन्हा केजे मेहता शाळा येथे संचलनाचा समारोप झाला. यावेळी उद्योजक जगदीश भगत, साने गुरूजी शिक्षण संस्थेचे ट्रस्टी प्रवीण जोशी, गट कार्यवाह, नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांच्यासह ८० स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
 
एकलहरे नगर
 
सायंकाळी ४:३० वाजता मारुती मंदिर येथून संचलनाला प्रारंभ होऊन माणिक चौक-तुंगार गल्ली-कानिफनाथ मंदिर-आंबेडकर चौक-शिवरत्न चौक-नायगाव रोड-शिंदेगाव मोठा पूल-शिवाजी पुतळा येथे समारोप झाला. यावेळी कार्यवाह, सहकार्यवाह, शारीरिक शिक्षण प्रमुखांसह ४८ स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
 
सावरकर नगर
 
मातोश्री लॉन्स येथून सकाळी ७:३० वाजता संचलनाला प्रारंभ झाला. पुढे अहुजा कॉम्प्लेक्स-भारत पेट्रोल पंप-तुळजाभवानी माता मंदिर-एकता डेअरी-शहा गार्डन-शेळके कॉम्प्लेक्स मार्गे मातोश्री लॉन्स येथे समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे हभप गणेश महाराज करंजकर उपस्थित होते. तसेच नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांच्यासह ११० स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
 
 
भोंसला गट
 
सोमेश्वर नगर
 
सोमेश्वर नगरच्या विविध शाखांनी सघोष पथ संचलनात सहभाग घेतला. हे पथ संचलन तानाजी मालुसरे शाखा सिरीन मेडोज येथून सकाळी ८ वाजता सुरू होऊन गंगापूर रोड वरून परत संघ स्थानात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून रितू अग्रवाल(संचालिका-विस्डम हाई ग्रुप ऑफ स्कूल्स) यांनी प्रबोधन करताना, संघाचा आम्हाला आणि सर्व देशाला खूप अभिमान आहे. संघाच्या गणवेशात आम्ही जेव्हा स्वयंसेवकांना बघतो तेव्हा आम्हाला सुरक्षित असल्याचा भाव येत असल्याचे सांगत संघाचे आणि स्वयंसेवकांचे आभार मानले. तसेच, संघ उत्तरोत्तर प्रगती करत राहो आणि देशसेवा करत राहो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी भोंसला गट कार्यवाह, नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांच्यासह १७५ स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
 
सातपूर नगर
 
छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मैदानापासून सकाळी ८ वाजता संचलनाला सुरूवात झाली. पुढे एकता चौक पासून डावीकडे-सातपूर कॉलनी बस स्टॉपपासून उजवीकडे-समता नगर मार्गे शिवाजी महाराज विद्यालय येथे समारोप झाला. प्रमुख पाहुणे म्हणून तिडके क्लासेसचे संचालक शशिकांत तिडके यांनी आपल्या उद्बोधनात शिस्त आणि संघाचे कार्य पाहून संघकार्यात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी शहर जिल्हा कार्यवाह, नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांच्यासह १३१ स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
 
टिळक नगर
 
सायंकाळी ५ वाजता संचलनाला सुरूवात झाली. अक्षर कॉलनी मैदान येथून सुरूवात होऊन पुढे समर्थ नगर महात्मा नगर रोड-पारिजात नगर सिग्नल-जयपूर हाऊस-सायकल सर्कल-कृषी नगर-जनजाती कल्याण आश्रम कार्यालय-मान्यवर चौक-कॉलेज रोड-कल्पना नगर-नंदन स्वीटस चौक-सायकल सर्कल-राष्ट्रीय दृष्टीहीन संघ शाळा-मनोहर कॉलनी मार्गे अक्षर कॉलनी मैदानात संचलनाचा समारोप झाला. पथसंचलनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शास्त्रज्ञ डॉ. अपूर्वा जाखडी उपस्थित होत्या. संचलनात नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांच्यासह २८६ स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
 
 
इंदिरा नगर गट
 
मोदकेश्वर नगर
 
सकाळी ७:१५ वाजता जाखडी नगर कॉर्नर येथून संचलनास प्रारंभ होऊन मोदकेश्वर मंदिर रोड-बापू बंगला-वीर सावरकर(रथचक्र) चौक-राजसारथी सोसा.-कलानगर (सिग्नल) चौक-१०० फुटी रोड- चार्वाक चौक-पेठे नगर रोड मार्गे जाखडी नगर कॉर्नर येथे समारोप झाला. या संचलनास तरुण यशस्वी उद्योजक डॉ. सतीश घोडेराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मोदकेश्वर नगर कार्यवाह, सहकार्यवाह, प्रभात शाखा, महाविद्यालयीन शाखा, तरुण व्यवसाय शाखा, बाल शाखा यातील २२५ स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
 
माणेकशॉ नगर
 
सकाळी ७:३० वाजता माणेकशॉ नगर येथून प्रारंभ झालेले हे संचलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, समता नगर, दारणा विद्यालय, पोद्दार विद्यालय, साई शिल्प रेसिडेंसी, समर्थ कॉलनी आणि श्रीराम कुंज सोसायटी श्रीराम मंदिर येथे संपन्न झाले. संचलनात घोष (बॅन्ड), भगवा ध्वज आणि सदंडधारी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहर संघचालक डॉ. विजयराव मालपाठक, मनोज पिंगळे, प्रशांत दिवे, अनिल ताजनपुरे, राहुल दिवे, राजेश गांगुर्डे आणि राजेश लेले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. सुमारे १५० हून अधिक स्वयंसेवक सघोष संचलनात सहभागी झाले.
 
गुरूगोविंदसिंह नगर
 
सायंकाळी ४:३० वाजता महागणपती मंदिर (जी.एस.टी. भवन रोड) येथून संचलनाला प्रारंभ होऊन राधा कृष्ण मंदिर-दामोदर नगर-नरहरीनगर-सिद्ध हनुमान मंदिर-स्ट्रॉबेरी शाळा-गुरुकृपा मॉल-साईबाबा मंदिर-गजानन महाराज मंदिर-राव टेक्स्टईल-आनंद नगर पोलीस चौकी मार्गे महा गणपती मंदिर येथे समारोप झाला. नाशिक विभाग सहकार्यवाह यांच्यासह नगर कार्यवाह, सहकार्यवाह आणि एकूण २१० स्वयंसेवकांची यावेळी उपस्थिती होती.
 
 
पंचवटी गट
 
पंचवटी नगर
 
मैत्रबंधन सोसायटी येथून सकाळी ८ वाजता संचलनाला प्रारंभ झाला. पुढे क्रांती नगर-नीलेश कलेक्शन-मधुबन कॉलनी-ड्रीम कैसल सिग्नल-क्रांती नगर-भावबंधन मंगल कार्यालय याठिकाणी समारोप झाला. अशोक कुमावत प्रमुख अतिथी होते. यावेळी नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांच्यासह ७० स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
 
भद्रकाली नगर
 
सकाळी १० वाजता प्रज्ञा नगर येथून सुरूवात झाल्यानंतर प्रगती सोसायटी-सिद्धेश्वर महादेव मंदिर-कोळीवाडा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक-शिंपी गल्ली-सिद्धेश्वर महादेव मंदिर मार्गे प्रज्ञा नगर येथे समारोप झाला. प्रमुख पाहुणे म्हणून व्यावसायिक अनिकेत गाढवे उपस्थित होते. यावेळी पंचवटी गट कार्यवाह, सहकार्यवाह, भद्रकाली नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांसह १०७ स्वयंसेवक उपस्थित होते.
 
रविवार कारंजा नगर
 
सकाळी ७ वाजता गोदाघाटापासून (खंडेराव महाराज मंदिर) सुरूवात होऊन गंगा टी हाऊस-तिवंधा चौक-सोमवार पेठ-नेहरू चौक-कानडे मारुती लेन-दूध बाजार-पिंपळ पार चौक-गाडगे महाराज पुतळा-मेनरोड-चांदीचा गणपती-गायधनी लेन-भांडी बाजार मार्गे पुन्हा खंडोबा मंदिर येथे समारोप झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सनदी लेखापाल शरद शहा उपस्थित होते. संघाच्या समाजासाठी सुरू असलेल्या कार्यासाठी आणि १०० व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचवटी गट संघचालक, सहकार्यवाह, नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांच्यासह ८० स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
 
 
आडगाव-म्हसरूळ गट
 
महात्मा फुले नगर
 
सकाळी ८ वाजता जिजामाता सार्वजनिक उद्यान जुईनगर किशोर सूर्यवंशी मार्ग येथून संचलनाला सुरूवात होऊन पीव्हीजी कॉलेज-रिलायन्स पेट्रोलपंप-कलानगर-श्री साई मंदिर पोकार कॉलनी-सावरकर गार्डन-स्वामी समर्थ केंद्र पुन्हा जिजामाता सार्वजनिक उद्यान, जुईनगर या ठिकाणी समारोप झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक कौस्तुभ मेहता उपस्थित होते. नगर कार्यवाह, सहकार्यवाह, प्रांत, शहर आणि गट पदाधिकार्‍यांसह १०४ स्वयंसेवक उपस्थित होते.
 
मखमलाबाद नगर
 
रविवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.१५ वाजता संत जनार्दन स्वामी उद्यान, शिंदे नगर येथून संचलनाला प्रारंभ झाला. पुढे दौलत बंगला-भाविक बिल्डिंग-हनुमान मंदिर-महादेव मंदिर-कपालेश्वर गारमेंट-हनुमान मंदिर-शिंदे नगर शंकर मंदिर मार्गे पुन्हा जनार्दन स्वामी उद्यान, शिंदे नगर या ठिकाणी समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक भीमराव ढाकणे, समाजकल्याण विभागाचे संदीप घुगे उपस्थित होते. नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांच्यासह ८६ स्वयंसेवक उपस्थित होते.
 
तपोवन नगर
 
जिजामाता उद्यान क्रीडा नगरी या ठिकाणाहून सकाळी ८ वाजता संचलन सुरू होऊन पुढे उमिया सोसायटी मार्गे लामखेडे मळा-तारवाला नगर, श्री संभाजी चौक जिजामाता उद्यान या ठिकाणी संचलन संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. धनंजय सांगळे उपस्थित होते. यावेळी नाशिक शहर सहकार्यवाह, नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांच्यासह ७१ स्वयंसेवक उपस्थित होते.
 
कोणार्क नगर
 
रविवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता पार्क साईड होम सोसायटी येथून संचलनाला सुरूवात होऊन हनुमान नगर मार्गे पुन्हा तिथेच समारोप झाला. वक्ते सुमेध देशमुख, तर प्रमुख पाहुणे प्रदीप गायकवाड होते. यावेळी नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांसह १५० उपस्थिती होती.
 
 
सिडको गट
 
जुने सिडको नगर
 
सकाळी ७.३० वाजता ग्रामोदय तरुण व्यवसाय संघस्थानापासून संचलनाला प्रारंभ झाला. पुढे शांतीवनला फेरा मारून अर्जुन प्रभात-मरी माता मंदिर मार्गे ’बडदे नगर’ राज मेडिकल; शिवाजी महाराज चौक-राज फोटो स्टुडिओमार्गे संघस्थानी समारोप झाला. प्रमुख अतिथी म्हणून सुनील पवार (पीआय, अंबड) यांच्यासह गट कार्यवाह, नगर कार्यवाह, सहकार्यवाह, पथसंचलन मुख्य शिक्षक यांच्यासह एकूण उपस्थिती १७८ होती.
 
अंबड नगर
 
सकाळी ९ वाजता सिद्धिविनायक गणेश मंदिर, उपेन्द्र नगर, संघ स्थानापासून संचलन प्रारंभ होऊन गौरी शंकर मंगल कार्यालय-गणेश मंदिर-अटळ सेवालय कार्यालय-एकदंत नगर-महाजन नगर वस्ती-दक्षिण मुखी हनुमान मंदिर-अतूल स्वीट मार्गे पुन्हा संघस्थानी संचलन संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून हभप सुरेश महाराज साठे उपस्थित होते. यावेळी सिडको गट कार्यवाह, सहकार्यवाह, अंबड नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांच्यासह एकूण उपस्थिती ७५ होती.
 
पवन नगर
 
पवन नगराच्या संचलनाला सकाळी ८ ते ९.१५ या वेळात पवन नगर मैदानापासून सुरूवात होऊन रायगड चौक-महाकाली वस्ती-जनकल्याण संकुल मार्गे पुनः संघस्थानी संपन्न झाले. बांधकाम व्यवसायिक तथा कालिका मंदिराचे ट्रस्टी संतोष कोठावळे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सिडको गट संघचालक, नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांच्यासह एकूण उपस्थिती ८८ होती.
 
खुटवड नगर
 
सायंकाळी ५.१५ ते ६ या वेळेत कामटवाडे येथील एकदंत चौकापासून सुरू झालेले संचलन श्री गजानन महाराज मंदिर इंद्रनगरी-सायखेडकर हॉस्पिटल-लक्ष्मी नगर मार्ग-पाटील वाडा-लक्ष्मी हाईट्स-जनक नगरी मार्ग-श्री हनुमान मंदिर चौक-खुटवडनगर जॉगिंग ट्रॅक याठिकाणी संपन्न झाले. संचलनानंतर शस्त्र पूजन पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नंदकुमार पाटील, तर वक्ते म्हणून मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले उपस्थित होते. संघाची आज खूप गरज असल्याचे सांगत त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर कार्यवाह, सहकार्यवाह यांच्यासह एकूण उपस्थिती १३५ होती.