मुंबई, दि. १३ : (Pravin Darekar) भाजप गटनेते, महाराष्ट्र विधान परिषद आमदार व तसेच मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या हस्ते वाढदिवस विशेष पुरवणीचे प्रकाशन दहिसर येथील आदित्य दरेकर आयोजित चांडक निवास येथील वह्या वाटप कार्यक्रमात रविवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. पुरवणीची संकल्पना अखिल भारतीय दैवज्ञ समाजाचे युवा प्रमुख विशाल कडणे यांची होती. यावेळी आ. प्रविण दरेकर यांनी विशेष पुरवणीचे कौतुक केले. तसेच दै. ‘मुंबई तरुण भारत’चे आभार मानले. पुरवणी प्रकाशनादरम्यान विशाल कडणे यांनी आ. दरेकर यांना भेटवस्तू देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, ‘मुंबई हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष प्रकाश दरेकर, संचालक व अखिल भारतीय दैवज्ञ समाज युवा प्रमुख विशाल कडणे, तसेच अखिल दैवज्ञ समाजाचे युवा कार्यकर्ते व व्यावसायिक राजेश सातघरे, प्रथमेश बेळलेकर, सिद्धेश बेळलेकर आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’चे स्पेस सेलिंग सेल्स एक्झिक्युटिव्ह रविंद्र जाधव, वितरण प्रतिनिधी राजन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.