धक्कादायक ! हिजबुल्लाहच्या ड्रोन हल्ल्यात ४ इस्रायली सैनिकांचा मृत्यू

    14-Oct-2024
Total Views |

drone attack
 
तेल अवीव :हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने, रविवारी हैफा शहरातील इस्रायलच्या लष्करी तळावर हल्ला केला. या हल्ल्यात, ४ इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला असून, तब्बल ७० जणं जखमी झाल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. हैफा शहराच्या दक्षिणेकडील असणाऱ्या लष्करी तळाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा खात्मा केल्यानंतर, हिजबुल्लाने प्रतिउत्तर दिल्याचे बोलले जात आहे.

मिरसाड-१ आणि इराणची साथ.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने मिरसाड-१ या ड्रोनचा वापर करत, हा हल्ला घडवून आणला आहे. मागची दोन दशके इस्रायलच्या विरोधात कारवाई करण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल ४० किलोची स्फोटके समावून घेण्याची क्षमता असलेल्या या ड्रोनने इस्रायलच्या सुरक्षाव्यवस्थेला चकवा देऊन निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे. हिजबुल्लाहच्या या कारवाईमध्ये इराणचा सुद्घा समावेश असून, हिजबुल्लाहला शस्त्रसाठा पुरवण्यामध्ये इराण अग्रेसर आहे.

हिजबुल्लाहची दहशत कायम
लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर सुद्धा हिजबुल्लाहचे दहशतवादीचे शांत बसले नाही. इस्रायलच्या सरकारला धमकी देत म्हणाले की हैफा आणि तबरैया मधील सगळ्या घरांना आम्ही लक्ष्य करणार आहोत. आमच्या प्रतिकारासाठी आम्ही ती घरे उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही. तिकडच्या राहिवाश्यांनी आपआपली घरे रिकामी करावीत, अथवा परिणाम चांगले होणार नाही. इस्रायलच्या विरोधात उघडलेल्या आघाडी मध्ये हिजबुल्लाहने अशा अनेक निष्पाप जीवांची हत्या केली असून सदर भागात, हिजबुल्लाहची दहशत कायम असल्याचे दिसून आले आहे.