आ. अमित साटम यांचा कार्यअहवाल प्रकाशित

14 Oct 2024 12:29:07
 
ameet satam
 
मुंबई, दि. १३ : (Ameet Satam) भाजपचे अंधेरी (पश्चिम) येथील आमदार अमित साटम यांनी गेल्या दहा वर्षांत राबविलेल्या विकास उपक्रमांचा कार्यअहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी प्रकाशित करण्यात आला.
साटम यांच्या कामगिरीच्या अहवालाचे प्रकाशन करताना फडणवीस म्हणाले की, “निवडून आलेला लोकप्रतिनिधी परिसराच्या विकासाचा चेहरा कसा बनू शकतो, याचे साटम हे एक आदर्श उदाहरण आहे. राजकारणातून जनसेवा कशी करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी शुभेच्छा देतो,” असे फडणवीस म्हणाले.
 
२०१४ आणि २०१९ साली दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या साटम यांनी आपल्या विविध विकासकामांची माहिती कामगिरी अहवालातून मांडली आहे. यात “५८ उद्याने, १०० हून अधिक नव्याने बनवलेले रस्ते, जुहू समुद्रकिनारा सुशोभीकरण प्रकल्प, गिल्बर्ट हिल संवर्धन प्रकल्प, ४०० हून अधिक सीसीटीव्ही बसवणे, २५ हून अधिक समाज कल्याण केंद्रे आणि झोपडपट्ट्यांमध्ये १०० हून अधिक शौचालये यांचा विकास करण्यात आला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या मार्गाचा अवलंब करून अंधेरी पश्चिमचा मतदारसंघाचा सर्वसमावेशक विकास केला असल्याचे साटम म्हणाले. आम्ही दहा वर्षांत ५० हून अधिक उद्याने विकसित करून एक विक्रम केला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नव्याने बनवलेले १०० हून अधिक रस्ते आणि ४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यावर भर दिला आला आहे,” असे साटम यांनी सांगितले.
 
पुढच्या टर्ममध्ये ’ही’ कामे करणार : आ. साटम
 
आपल्या भविष्यातील योजनांची माहिती देताना साटम म्हणाले की, “आता जुहू येथे बहुउपयोगी नागरी सुविधा, हॉकर्स प्लाझा, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, डीएननगर येथील एज्युटेनमेंट थीम पार्क आणि अंधेरी (पश्चिम) बीचवर मरीन एंटरटेनमेंट झोन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मी अंधेरी पश्चिमच्या विकासासाठी सतत काम करत राहीन आणि जोपर्यंत ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही साटम यांनी दिली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0