उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल! ब्लॉकेज आढळल्याने तातडीने अँजिओप्लास्टी
14-Oct-2024
Total Views |
मुंबई : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ते सध्या रुग्णालयात असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
उद्धव ठाकरे सोमवारी सकाळी ८ वाजता आपल्या नियमित तपासणीसाठी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान, त्यांच्या हृदयातील धमन्यांमध्ये ब्लॉकेज आढळल्याने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. याआधीसुद्धा २०१२ उद्धव ठाकरेंची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.