शुभम अशी खोटी ओळख सांगून शोएबचे महिलेसोबत हैवानी कृत्य

14 Oct 2024 16:09:26

Sexual abuse of women
 
डेहराडून : उत्तराखंड येथील ऋषिकेश येथे शोएब नावाच्या कट्टरपंथी तरूणाने शुभम नाव असल्याचे सांगून हिंदू महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याने महिलेवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला. याप्रकरणी आता महिलेने प्रश्न उपस्थित केला असता, शोएबला हिंदू संघटनांनी पकडून मारहाण केली होती.
 
प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश येथील व्यापारी विशाल अग्रवाल आणि त्यांची पत्नी शहरातील एका जिममध्ये जातात. शोएब नावाचा तरुण त्यावेळी त्याठिकाणी येतो. सुमारे २० दिवसांपूर्वी शोएबने व्यापारी अग्रवाल यांच्या पत्नीला आपले नाव शुभम सांगितले आणि त्यांच्यात बोलणं सुरू झाले.
 
 
 
शोएबने विशाल यांच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक शोधून काढला असून तिला फेक अकाऊंटवरून मेसेज पाठवणे सुरू केले होते. यानंतर आता महिलेने शोएबला नकार दिल्यावर त्याने महिलोसोबत गैरवर्तन करणे सुरू केले. शोएबने जिममध्ये महिलेसोबत विनयभंग केला होता.
 
शोएबने महिलेला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबदरस्ती करण्याचा प्रयत्न केला. संबंधित प्रकरणाची माहिती ही हिंदू संघटनांपर्यंत पोहोचली होती. यावेळी हिंदू संघटनांनी शोएबला बेदम मारहाण केली. त्यानंतर शोएबच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यात आले होते.
 
हिंदू संघटनांनीही शोएबविरोधात तक्रार दाखल केली असून अशा घटना सतत घडत आहेत. जर पुन्हा अशी घटना घडली तर पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंग आणि धमकीचा गुन्हा दाखल करावा असे सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0