मुंबई : लाखों वाहनधारकांना टोलमाफीच्या निर्णयाचा लाभ होणार, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. राज्य सरकारने मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री १२ वाजतापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
हे वाचलंत का? - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला उद्योगपती रतन टाटांचे नाव! मंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती
याबद्दल बोलताना संजय केळकर म्हणाले की, "मुंबईकडे जाणाऱ्या छोट्या आणि हलक्या वाहनांना पुर्णपणे टोलमुक्त करण्यात आले आहे. लाखों वाहनधारकांना याचा मोठा लाभ होणार आहे. गेली ९ वर्षे आम्ही सातत्याने टोलमुक्तीची मागणी करत आहोत. त्यासाठी विधिमंडळात, विधिमंडळाच्या बाहेर आंदोलने आणि उपोषण करत आलोत. आज राज्य सरकारने या वाहनधारकांना फार मोठा दिलासा दिला आहे," असे ते म्हणाले. तसेच त्यांनी या निर्णयासाठी महायूती सरकारचे आभार मानले.