मालवणीत धर्मांधांना दाखवली हिंदुत्वाची ताकद!

दुर्गामातेचा अनादर करणाऱ्यांना शिकवला धडा

    14-Oct-2024
Total Views |

Malwani Hindu News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Malwani Hindu News)
विजयादशमीच्या दिवशी मालाड मालवणी येथे घडलेल्या एका घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचा व्हिडिओदेखील समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, काही धर्मांधांनी दुर्गामातेच्या मंडपात घुसून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप येथील हिंदू समाजाने आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर मोठ्या धैर्याने प्रतिक्रिया देत एकजुटीने या घटनेचा सामना केला आहे. त्यामुळे आता हिंदू पळून जाणार नाही तर पराक्रम दाखवतील अशा प्रकारचा संदेश समाजात जागृत झाला आहे.

हे वाचलंत का? : दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकीत कट्टरपंथीयांकडून दगडफेक



प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही धर्मांधांनी दुर्गामातेच्या मंडपात घुसून देवीच्या मूर्तीचा अनादर केला. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि हिंदू समाजात तीव्र नाराजी पसरली. स्थानिक लोकांनी यास लगेचच विरोध केला. आता हिंदू पळून जाणार नाहीत तर पराक्रम दाखवतील असे म्हणत त्यांना या घटनेचा शांततेने निषेध तर केलाच परंतु संघटित होऊन त्यास चोख प्रत्युत्तरही दिले. या घटनेने मालाड मालवणीतील हिंदू समाज एकवटला. लोकांनी संघटित होऊन आता कोणत्याही प्रकारचा धार्मिक अपमान सहन करणार नाही, असा संदेश दिला आहे. त्यासोबतच दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे.