मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाला प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांचे नाव देण्यात येणार आहे. सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबद्दलची माहिती दिली.
हे वाचलंत का? - राज्यात प्रधानमंत्री आवास योजना २.० राबवणार! मंत्रिमंडळाचे १९ महत्वपूर्ण निर्णय
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "महाराष्ट्रात देशातील सर्वात पहिले कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन झाले होते. या विद्यापीठाच्या राज्यात पाच शाखा आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाचे नाव पद्मविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ असे करण्यात आले आहे. देशातील सर्व क्षेत्रांमध्ये रतन टाटांचे नाव अग्रस्थानी होते. दरम्यान, देशातील पहिल्या कौशल्य विद्यापीठाचे नामकरण रतन टाटांच्या नावाने करण्याचे सौभाग्य आपल्यालाल मिळाले आहे," असे ते म्हणाले. तसेच या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभारही मानले.