हिंदू समाजाला स्व रक्षणासाठी संघटित व्हावे लागेल : डॉ. कृष्णगोपालजी

    14-Oct-2024
Total Views |

Krushnagopalji Vijayadashmi Utsav

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Krushnagopalji Vijayadashmi Utsav)
"हिंदु राष्ट्र म्हणजे संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन चालणे. विविधतेत एकता असलेला आपला भारताचे संपूर्ण जगात त्याचे विशेष स्थान आहे. सुसंस्कृत संघटित हिंदू समाज निर्माण करणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हिंदू समाजाला स्व रक्षणासाठी संघटित व्हावे लागेल.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी यांनी केले.

हे वाचलंत का? : धर्म आणि उदात्त कृतीतून भारताच्या गौरवशाली परंपरांचे रक्षण

विजयादशमी उत्सव आणि संघ शताब्दी वर्षाची सुरुवात यानिमित्त जोधपूर येथील चामी पोलो मैदानावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर जनरल रानू सिंह राठोड व्यासपीठावर उपस्थित होते.


Krushnagopalji Vijayadashmi Utsav

उपस्थितांना संबोधत डॉ. कृष्णगोपालजी म्हणाले, भारत, जगातील सर्वात जुना देश, संपूर्ण जगाला विचार आणि आचरण देण्याचे कार्य करतो. सध्या देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ७५ हजार शाखा आहेत. वर्षातील ३६५ दिवस शाखेत येऊन संघाचे स्वयंसेवक राष्ट्र उभारणीसाठी कटिबद्ध आहेत. येत्या एका वर्षात या कामाचा विस्तार होणार असून एक लाख गावांमध्ये संघ शाखा पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.