राज्यातील पहिले वातानुकुलीत चालक- वाहक विश्रांतीगृह

14 Oct 2024 12:53:26

mumbai central


मुंबई, दि.१४ : 
मुंबई सेंट्रल येथील राज्यातील पहिल्या वातानुकूलित चालक - वाहक विश्रांती गृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार, दि.१३ रोजी संपन्न झाले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर व एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीद्वारे राज्यातील वेगवेगळ्या आगारातून बसेस घेऊन येणाऱ्या सुमारे ३०० चालक- वाहकांसाठी तसेच मुंबई आगारातील १०० चालका -वाहकांसाठी सुमारे ९० लाख रुपये खर्चून वातानुकुलीत असे ३ अत्याधुनिक विश्रांती कक्ष बांधण्यात आले आहे. या विश्रांतीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार, दि.१३ रोजी संपन्न झाले.

या विश्रांती कक्षांमध्ये टू टिअर बॅक बेडसह, करमणूक कक्ष, जेवणासाठी स्वतंत्र हॉल, स्वच्छ व टापटीप असे प्रसाधनगृहे निर्माण करण्यात आली आहेत. अशाच प्रकारचे वातानुकूलित विश्रांती कक्ष परळ, कुर्ला नेहरू नगर ,बोरवली नॅन्सी कॉलनी येथील आगारात तयार करण्यात येणार असून ठाण्यातील खोपट बस स्थानकावर दुसरे वातानुकूलित कक्ष बांधून तयार झाले आहे. त्याचेही लवकरच उद्घाटन होणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
Powered By Sangraha 9.0