मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत टोलसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आहे. सोमवारी रात्री १२ वाजतापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. विधानसभा निवडणूकीपूर्वी मंत्रिमंडळाची ही शेवटी बैठक असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत वाशी, ऐरोली, मुलुंड, दहिसर आणि आनंदनगर या मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी देण्यात येणार असून रात्री १२ वाजतापासून हा निर्णय लागू होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.