दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांकडून डिजे जप्त

    14-Oct-2024
Total Views |
 
Durga Puja Immersion Procession
 
रांची : झारखंड येथे पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात पोलिसांनी दुर्गापूजा विसर्जन मिरवणुकीत लावण्यात आलेला डिजे जप्त करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी हिंदूंनी पोलिसांच्या या कृत्याला विरोध दर्शवत देवी मूर्तीचे विसर्जन करणार नाही यावर ते ठाम राहिले. ही घटना रविवारी १३ ऑक्टोबर रोजी चक्रधरपूर, पश्चिम सिंहभूम येथे घडली होती.
 
प्रसारमाध्यमानुसार, दुर्गापूजा समितीचा असलेला डि़जे जप्त केला. विसर्जनावेळी मिरवणुकीत वाजवण्यास आलेला डिजे पोलिसांनी पोलीस ठाणे येथे नेला. न्यायालय आणि सरकारच्या आदेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगून पोलिसांनी डिजे देणार नाही असे सांगितले. हा डिजे आदर्श दुर्गा समितीचा होता. दुपारपासून समितीने डिजेची मागणी केली होती. पोलिसांनी पूजा समितीला डिजे परत करण्यास नकार दिला.
 
याप्रकरणात पुन्हा गदारोळ झाला. देवी मातेच्या अनेक मूर्त्यांचे विसर्जन होणार होते. अनेक मिरवणुका निघाल्या होत्या. तेव्हा त्यांना काहीही करता आले नाही त्यांना रविवारी उशीरा मूर्तीचे विसर्जन करता आले.