राज्यात प्रधानमंत्री आवास योजना २.० राबवणार! मंत्रिमंडळाचे १९ महत्वपूर्ण निर्णय

    14-Oct-2024
Total Views |
 
Cabinet
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूकीपूर्वी मंत्रिमंडळाची ही शेवटी बैठक असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  SNDT महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारातील विद्यार्थिनींसाठी ४४ आसनी बसचे लोकार्पण!
 
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय पुढीलप्रमाणे -
 
१) मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्री १२ वाजतापासून अंमलबजावणी.
२) आगरी समाजासाठी महामंडळ
३) समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम
४) दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता
५) आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता
६) वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता
७) राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
८) पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी
९) खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य
१०) राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार
११) पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता
१२) किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ
१३) अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ
१४) मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे
१५) खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना
१६) मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा
१७) अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
१८) उमेदसाठी अभ्यासगट
१९) कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव