मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचा मुंबईतील पत्ता पुढे आला आहे. कुर्ल्यातील पटेल चाळीत हे आरोपी राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिष्णोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे.
बाबा सिद्दीकींची हत्येत सहभागी असलेल्या तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. धर्मराज कश्यप, गुरनैल सिंह आणि प्रवीण लोणकर असे त्यांचे नाव आहे. तर या प्रकरणातील चौथा आरोपी सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची १५ पथके रवाना झाली आहेत.
हे वाचलंत का? - उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल! ब्लॉकेज आढळल्याने तातडीने अँजिओप्लास्टी
सप्टेंबरपासून हे आरोपी कुर्ला परिसरातील पटेल चाळीत भाड्याच्या घरात राहत होते. बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी या आरोपींना अडीच लाख रूपयांची सुपारी मिळाली होती. पटेल चाळीत घरात राहून त्यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला. दरम्यान, आता याप्रकरणी नवनवीन खुलासे पुढे येत आहेत.