मुंबई : एअर इंडिया कंपनीचे विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या बॉम्बच्या सहाय्याने उडवण्यात येईल अशी धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. बॉम्बच्या धमकीनंतर विमानाचे नवी दिल्ली येथे अपत्कालीन परिस्थितीत लँडिंग करावे लागले. दुसरीकडे मुंबईहून हावडा येथून जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेतही बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती.
याप्रकरणी आता एअर इंडियाच्या विमानाला ही धमकी देण्यात आली. एअर इंडियाच्या या विमानाने मुंबईहून पहाटे २ वाजताच्या सुमारास उड्डाण केले असून धमकी देण्यात आली आहे. मध्यंतरी ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. यावेळी प्रवाशांना विमानातून उतरवल्यानंतर याप्रकरणी कसून चौकशी करण्यात आली. ही धमकी खोटी असल्याची माहिती आता समोर आली आहे.
त्याचवेळी मुंबई हावडा एक्स्प्रेसलाही ट्विटरवर फझलुद्दीन नावाच्या हँडलवरून रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती. यावेळी सोशल मीडिया युझरने लिहिले की, आज लोक रक्ताचे अश्रू ढाळतील. ही रेल्वे नाशिक येथे थांबवून तिची तपासणी करण्यात आली. ही धमकीही खोटी निघाली असून त्यानंतर रेल्वे रवाना करण्यात आली होती.