‘शिख फॉर जस्टीस’वरील बंदी पाच वर्षांनी वाढवली

13 Oct 2024 15:05:27

sikh for justice
 
नवी दिल्ली : ( Sikh for Justice )देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘शिख फॉर जस्टिस’वरील बंदी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. देशाच्या अखंडतेवर आणि सार्वभौमत्वावर आघात केल्याप्रकरणी या संघटनेवर ही कारवाई करण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. ‘स्वतंत्र खलिस्तानी राष्ट्र’ निर्माण करण्याच्या दिशेने ‘शिख फॉर जस्टीस’ ही संघटना सक्रिय झाली आहे. ही संघटना सातत्याने देशविरोधी कारवाया करत असते, असेही अधिसूचनेच नमूद करण्यात आले आहे.
 
‘शिख फॉर जस्टिस’वर २०१९ साली पहिल्यांदा बंदी घालण्यात आली. त्यानंतर गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी करून या संघटनेला देशाच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. सार्वमताच्या नावाखाली ही संघटना सातत्याने अतिरेकी आणि फुटीरतावादाच्या विचारसरणीचा प्रचार करत असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. ‘शिख फॉर जस्टीस’ विरुद्ध भारतातही अनेक खटले दाखल असून त्यांची चौकशी सुरू आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0