जगातील एक प्रतिष्ठित मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार.’ शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थजगत या क्षेत्रात, उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी साहित्यासाठी जाहीर झालेल्या नोबेल पुरस्काराने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
जगातील एक प्रतिष्ठित मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार.’ शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थजगत या क्षेत्रात, उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी साहित्यासाठी जाहीर झालेल्या नोबेल पुरस्काराने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
साहित्यासाठीचा या वर्षीचा ‘नोबेल पुरस्कार’ दक्षिण कोरियातील ’हान कांग’ यांना जाहीर झाला आणि संपूर्ण जगाला एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला. १९०१ सालापासून ‘नोबेल पुरस्कार’ देण्यास सुरूवात झाली. जगप्रसिद्ध वैद्यानिक आल्फ्रेड नोबेल यांचे १८९६ साली निधन झाले. त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांच्या अमाप संपत्तीचा मोठा वाटा, नोबेल पुरस्कारांसाठी राखून ठेवल्याची नोंद करून ठेवली होती. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता आणि वैद्यकशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना त्यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे ही त्यांची इच्छा होती. सुरूवातीला फक्त पाच क्षेत्रांसाठी ‘नोबेल पुरस्कार’ दिले जायचे, पण, १९६९ सालापासून स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावा ‘नोबेल पुरस्कार’ देण्यास सुरूवात केली.
नोबेल पुरस्काराला सुरूवात होऊन जवळपास एक शतक उलटून गेले. पण, आजवर दिल्या गेलेल्या या नोबेल पुरस्कारांच्या यादीत केवळ, अठराच महिलांचा समावेश होता. दुर्दैव म्हणजे त्यात आशिया खंडातील एकाही महिलेचा समावेश नव्हता. पण, दक्षिण कोरियातील हान यांग यांनी ही प्रथा खंडित केली आणि त्या आशिया खंडातील ‘नोबेल पारितोषिक’ मिळवणार्या पहिला महिला ठरल्या. इतकेच नाही, तर दक्षिण कोरियातील ‘नोबेल पारितोषिक’ मिळवणार्या त्या दुसर्या व्यक्तीही ठरल्या आहेत. या आधी दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष किम दाइ जंग यांना, सन २००० साली ‘शांततेचा नोबेल पुरस्कार’ मिळाला होता.
हान कांग यांनी हा ‘नोबेल पुरस्कार’ मिळवून जगाला एक आदर्श घालून दिला आहे. हान कांग यांचा जन्म १९७० साली दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू शहरात झाला. वयाच्या नवव्या वर्षी दक्षिण कोरियाची राजधान सिओलमध्ये स्थायिक झाल्या. वडील कादंबरीकार असल्यामुळे, त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच साहित्याचे बाळकडू मिळाले होते. १९९३ साली हान कांग यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यांनी साहित्यक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांचा पहिला कथासंग्रह आणि ‘ब्लॅकडीअर’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. त्यांची २००७ साली प्रकाशित झालेली ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीने त्यांना, साहित्यविश्वात खरी ओळख मिळवून दिली. याच कादंबरीला २०१६ साली ‘आंतरराष्ट्रीय बूकर पुरस्कार’ही मिळाला होता.या कादंबरीसोबतच त्यांच्या ‘ग्रीक लेसन्सस’, ‘ह्यूमन क्टस’, ‘द व्हाइट बूक’ या कादंबर्या इंग्रजीत भाषांतरीत झाल्या आहेत.यांच्या‘द व्हाइट बूक’ या कादंबरीचाही ‘आंतरराष्ट्रीय बूकर पुरस्कारा’साठी विचार केला गेला होता. साहित्यक्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आले आहे. “हान कांग कविता आणि कथा हे दोन्ही साहित्यप्रकार उत्तमरीत्या हाताळतात. त्यामुळेच त्यांच्या गद्य साहित्यात सुद्धा एक प्रकारची काव्यात्मकता जाणवते,” अशी प्रतिक्रिया त्यांना वाचकांकडून मिळते. ऐतिहासिक घटनांचे वर्णन करताना, हान कांग मानवी भावना अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडतात. त्यांच्या या प्रभावी लिखाणामुळेच त्यांना ‘नोबेल पुरस्कारा’साठी पात्र ठरवण्यात आले आहे. नोबेल समितीचे अध्यक्ष अँडर्स ऑल्सन यांनी, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर हान कांग यांचे अभिनंदन केले. “स्त्रियांची असुरक्षितता, स्त्रियांचे जीवन यांच्याबद्दल कायमच हान सक्रिय असतात. त्याची मांडणी काव्यात्मक आणि प्रयोगात्मक शैलीतून करण्याचे त्यांचे तंत्र, समकालीन गद्यांमध्ये अगदी नाविन्यपूर्ण आहे,” असे कौतुकोतगार अध्यक्ष अँडर्स ऑल्सन यांनी काढले आहेत. साहित्य क्षेत्रातील ‘नोबेल पुरस्कारा’साठीच्या समितीच्या सदस्य ना कॅरिन पाम यांनीही “हान कांग हृदयाला भिडणारे गद्यात्मक काव्याची मांडणी करतात. ते अतिशय नाजूक आणि प्रसंगी कठोर असते.” अशा शब्दांत हान कांग यांचे कौतुक केले आहे.
हान कांग यांना मिळालेला हा ‘नोबेल पुरस्कार’ दक्षिण कोरिया आणि संपूर्ण आशिया खंडातील लेखकांना, खास करून स्त्री लेखिकांना प्रेरणा देणारा ठरेल यात काही शंका नाही.
दिपाली कानसे