उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीसाठी भाजप सज्ज

    12-Oct-2024
Total Views |

up bypolls
 
नवी दिल्ली, दि. १२ : (Uttarpradesh)उत्तर प्रदेशातील १० विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आज (१३ ऑक्टोबर) रोजी भाजप मुख्यालयात बैठक होणार आहे.
 
प्राप्त माहितीनुसार, भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रिजेश पाठक आणि प्रदेश संघटनमंत्री धरमपाल हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
 
उत्तर प्रदेशातील १० विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या तारखा या महिन्यातच जाहीर केल्या जाऊ शकतात. येत्या काही दिवसातच निवडणूक आयोग हा कार्यक्रम जाहीर करेल, असे मानले जात आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासोबतच उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला जाऊ शकतो.