विमा कंपन्यांच्या प्रीमियममध्ये लक्षणीय वाढ; एनबीपी १४ टक्के!

12 Oct 2024 15:17:41
insurance companies premium rised


मुंबई :      जीवन विमा कंपन्यांनी नवीन व्यवसाय प्रीमियम(एनबीपी)मध्ये वाढ झाली आहे. एनबीपी सप्टेंबरमध्ये वार्षिक आधारावर १४ टक्कयांनी वाढला आहे. विमा क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(एलआयसी) यासह खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या प्रीमियममध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.




दरम्यान, लाईफ इन्शुरन्स कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये आयुर्विमा कंपन्यांचे एकूण एनबीपी ३५,०२० कोटी रुपये होते. त्याचबरोबर, एनबीपी वार्षिक आधारावर १२.४ टक्क्यांच्या वाढीसह २०,३६९.२६ कोटी रुपये झाले आहे. खाजगी विमा कंपन्यांचे एकूण एनबीपी गेल्या वर्षीच्या तुलनेत १६.३७ टक्क्यांनी वाढून १४,६५१.०२ कोटी रुपये झाले आहे.

विमा क्षेत्रातील वैयक्तिक सिंगल प्रीमियम दरवर्षी सुमारे १३ टक्क्यांनी वाढून ५,१४२ कोटी रुपये झाला आहे. तर वैयक्तिक नॉन-सिंगल प्रीमियम ३५.२३ टक्क्यांनी वाढून ११,५०० कोटी रुपये झाला आहे. परिणामी, जीवन विमा कंपन्यांच्या नवीन व्यवसाय प्रीमियममध्ये सप्टेंबरमध्ये १४ टक्के इतकी वाढ नोंदविण्यात आली आहे.




Powered By Sangraha 9.0