दिल्लीची अर्थव्यवस्था आपमुळे उध्वस्त – भाजपचा आरोप

12 Oct 2024 16:39:11

bansuri swaraj
 
नवी दिल्ली : भाजपने शुक्रवारी आम आदमी पक्षावर (Aam Aadmi Party) दिल्लीची अर्थव्यवस्था उध्वस्त केल्याचा आरोप केला. भाजप खासदार बांसुरी स्वराज यांना दिल्ली सरकारच्या २०२४-२०२५ च्या अर्थसंकल्पात ७ हजार कोटी रुपयांची तूट असल्याचा दावा केला आहे.
 
आप सरकारवर दिल्ली भाजपतर्फे टिकेचा भडीमार करण्यात येत आहे. भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत आप सरकारवर टिका केली. स्वराज यांनी अर्थसंकल्पात "खात्यात फेरफार" केल्याचा आरोप केला आणि नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांकडून (कॅग) कडून चौकशीची मागणी केली. स्वराज यांनी दावा केला, "आप सरकारने गेल्या वर्षी १०,००० बस मार्शलना काढून टाकले कारण त्यांनी त्यांच्या वेतनासाठी कोणतीही तरतूद केली नसल्याचे त्या म्हणाल्या.
 
दिल्ली सरकारची स्थिती सध्या उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याचा दावा त्यांनी केला, त्यामुळे दिल्ली सरकारला ७,००० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. पगार, कचरा उचलणे यासारख्या अत्यावश्यक सेवांसाठीही सरकारकडे पैसे नाहीत, असे त्या म्हणाल्या. आप 'प्रचार आणि भ्रष्टाचार' करण्यात व्यस्त आहे आणि त्यांचे नेते अरविंद केजरीवाल यांना फक्त सत्ता मिळवण्याची चिंता आहे, त्यांना जनतेच्या हिताची काळजी नाही, असाही आरोप खासदार स्वराज यांनी केला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0