मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावा
भाई गिरकर यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12-Oct-2024
Total Views |
मुंबई : (Vijay Girkar) मुंबईतील २८ हजार सफाई कामगारांच्या रखडलेल्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशी आग्रह मागणी माजी मंत्री, आमदार विजय (भाई) गिरकर यांनी शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी पालिका आयुक्त भुषण गगराणी यांच्याकडे केली.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारित केलेल्या शासन निर्णयानुसार घरांची उभारणी करण्यात यावी. कुलाबा येथील पंचशील नगर, राजवार्डकर स्ट्रीट येथे सुरू असलेल्या वसाहतीच्या निकृष्ठ कामाची पाहणी करून तातडीने कामाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. मुंबईतील इतर ठिकाणी तांत्रिक तसेच विविध कारणास्तव रखडलेल्या मालकी हक्काच्या घरांच्या वसाहतीचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी देखील निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
या सर्व विषयांची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त यांनी उपस्थित सफाई कामगारांना दिले. याप्रसंगी उपायुक्त शेखर चोरे, सफाई कामगार प्रतिनिधी अनिल कांबळे, संतोष गमरे, गोविंद पडवणकर, दीपक पवार, राजेंद्र मोहिते, मयुर देवळेकर, सत्यवान नर, सुनिल मांजरेकर यांच्यासह सफाई कामगार उपस्थित होते.