रत्नागिरीत धर्मांधांकडून संचलन अडवण्याचा प्रयत्न; 'अल्ला हू अकबर'च्या दिल्या घोषणा

12 Oct 2024 11:02:25

Ratnagiri RSS Sanchalan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ratnagiri RSS Sanchalan)
विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचालनावेळी काही धर्मांधांकडून 'अल्ला हू अकबर'च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री रत्नागिरीच्या कोकण नगर परिसरात सदर प्रकार घडला आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असून घोषणा देणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करावा व त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी रत्नागिरीतील नागरिकांकडून होत आहे. या सर्व प्रकारची गंभीर दखल जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली आहे.

हे वाचलंत का? : दुर्गामातेसमोर पोरांनी गायलं 'इस्लामी गीत'; नेटकऱ्यांचा संताप!


यावर्षी संघ शताब्दी वर्षाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पथसंचलने होत आहेत. परंतु रत्नागिरीत निघालेल्या पथसंचलनावेळी काही धर्मांधांनी 'अल्ला हू अकबर'च्या घोषणा दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील कोकण नगर वस्तीत ४० टक्के मुस्लिम रहिवासी आहेत. यात काही जिहादी प्रवृत्तीचे असून याठिकाणी गोमांस तस्करी, ड्रग्सरॅकेटसारखे प्रकारही चालतात. संचलनाच्या दिवशी ३० ते ४० धर्मांधांनी रस्त्यावर येत संचलन अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी अर्धा रस्ता अडवून धरला.

हा जाणीवपूर्वक रचलेला कट होता असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून सध्या होत आहे. याप्रकरणी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक असे एकूण ३०० जणं शहर पोलीस ठाण्यात रात्री ठिय्या मांडून होते. मध्यरात्री उशिरापर्यंत कारवाई प्रक्रिया सुरु होती. त्यानंतर आता पोलिसांनी कोकण नगर परिसरात घोषणाबाजी करणाऱ्यांपैकी ४ जणांना अटक केली आहे.

Powered By Sangraha 9.0