रिलायन्स डिजिटलच्या फेस्टिवल ऑफ इलेक्ट्रॉनिक्समुळे भारतात जोरात उत्सव साजरा होणार!

11 Oct 2024 18:34:40
 
reliance digital
 
रिलायन्स डिजिटल हा भारताचा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आहे. ज्याने फेस्टिवल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स सेल सादर करून दसरा सणाची रंगत आणखी वाढवली आहे. त्यासाठी अशा डील्स देत आहे ज्यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होईल. ग्राहकांना मोठ्या बँकांच्या कार्ड्स सोबत केलेल्या खरेदीवर ₹10000 पर्यंत तात्काळ सूट मिळवता येणार आहे. आणि हो, रिलायन्स डिजिटलकडून फायनान्सचे अनेक पर्याय दिले जात आहेत, ज्यात ₹22500 पर्यंत लाभ मिळेल. ह्यामुळे लेटेस्ट इलेक्ट्रॉनिक्स अपग्रेड करून हा सणासुदीचा काळ आणखी आनंददायक करता येईल.
 
ज्यांना टीव्ही पाहण्याचा अनुभव आणखी उत्तम करायचा आहे त्यांच्यासाठी कॅशबॅक नंतर ₹27499 ने सुरु होणारा 55 इंच 4K स्मार्ट टीव्ही आहे. एलजीचा OLED Evo AI C4 4K स्मार्ट टीव्ही 3 वर्षांच्या वॉरंटी सोबत ₹114990 ह्या डील किंमतीवर उपलब्ध आहे. इतकंच नाही!! सॅमसंग Neo QLED 4K स्मार्ट टीव्ही 3 वर्षांच्या वॉरंटी सोबत आणि 20% पर्यंत कॅशबॅक मिळवून विकत घ्या आणि ₹42490 किंमतीचा सॅमसंग 4K UHD TV मिळवा पूर्णपणे मोफत.
 
फिटनेस प्रेमींसाठी स्मार्ट घड्याळांवर आश्चर्यकारक डील्स आहेत. ॲपल वॉच सिरीज10 ही ₹44400 च्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे, ज्यामध्ये ₹2500 चा कॅशबॅक समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, ॲपल वॉच सिरीज 9 ही ₹ 1000 च्या कॅशबॅकसह ₹ 39900 च्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल.
 
स्मार्टफोन खरेदीदार iPhone 14 वर अपग्रेड करू शकतात आणि ₹5000 ची तात्काळ सूट आणि ₹4000 चा कॅशबॅक मिळवू शकतात. ते मोटोरोला फोनची विस्तृत श्रेणी देखील एक्सप्लोर करू शकतात, जी केवळ ₹9999 पासून सुरू होते फक्त रिलायन्स डिजिटलवर. आणि हो फक्त ₹ 26999 पासून सुरू होणारी गुगल पिक्सेल सिरीज देखील उपलब्ध आहे.
 
उत्तम लॅपटॉप शोधत असलेले खरेदीदार लॅपटॉपच्या विस्तृत श्रेणीवर ₹17500 पर्यंतचे फायदे मिळवू शकतात. लॅपटॉप्सची कोर i3 श्रेणी उपलब्ध आहे, ज्यामध्ये MS Office फक्त ₹25990 मध्ये प्री-इंस्टॉल केलेले आहे. AI लॅपटॉप्स ₹ 63499 पासून सुरू होतात आणि ॲपलच्या M3 श्रेणीचा ईएमआय ₹ 3199 दर महिना पासून सुरू होतो. तसेच, ₹53999 पासून सुरू होणाऱ्या 3050 ग्राफिक्स कार्ड्ससह गेमिंग लॅपटॉप्सवर आश्चर्यकारक डील्स मिळतील. याव्यतिरिक्त, यूपीआय व्यवहारांवर 10%अमर्यादित सूट देखील आहे, जी 2 किंवा अधिक लॅपटॉप ॲक्सेसरीजच्या खरेदीवर लागू होते (ऑफर निवडक सणासुदीच्या दिवसांसाठी वैध).
किचनमध्ये सुधारणा करू पाहणाऱ्या गृहिणींना लहान उपकरणांवर “बाय मोर, सेव्ह मोर” ऑफरचा खूप फायदा होईल. एक खरेदी करा आणि 5% सूट मिळवा, 2 खरेदी करा आणि 10% सूट मिळवा, 15% सूट मिळवण्यासाठी 3 आणि अधिक खरेदी करा. सर्वोत्कृष्ट किंमती आणि क्युरेटेड रेंजसह, एकाच इनव्हॉइसमध्ये एकापेक्षा जास्त उत्पादन खरेदी केल्यावर मोठी बचत करता येईल.
 
पर्सनल ऑडिओ चाहत्यांसाठी अशा डील्स आहेत ज्या कानाला संगीतासारख्या मधूरवाटतील! ॲपल एअरपॉड्स 4 प्रगत व्हॉइस आयसोलेशनसह ₹11900 च्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. ह्यासोबत, ₹538 /महिना पासून सुरू होणाऱ्या, नो-कॉस्ट ईएमआय सह ₹1000 कॅशबॅक मिळेल. जेबीएल लाइव्ह बीम 3 इअरबड्स आता 10% कॅश बॅकसह ₹13999 च्या आकर्षक किंमतीत उपलब्ध आहेत. होम ऑडिओफाईल्स 25%पर्यंत सूट आणि कॅशबॅकसह साउंड-बार्सच्या विस्तृत श्रेणीमधून देखील निवडू शकता. पार्टी स्पीकर्सवर ₹10000 पर्यंत सूट मिळवून पार्टी प्रेमी, पार्टीची धमाल वाढवू शकतात.
होम ओनर्स ₹28990 पासून सुरू होणाऱ्या 1.5 टन 3 स्टार स्मार्ट एसी सह उष्णता दूर करू शकतात. संपूर्ण गेम चेंजर स्मार्ट एआय ऑल-इन-वन वॉशर आणि ड्रायरसह कपडे धुण्याचं काम सोपं करा. वॉशर ड्रायर ₹47000 पासून सुरु होणाऱ्या किंमतीत मिळवा आणि ₹7295 किंमतीचे फ्री एअर फ्रायर घरी आणा. ₹47990 पासून सुरू होणारे निवडक साइड बाय साइड आणि 350 लिटर्सपेक्षा जास्त रेफ्रिजरेटर खरेदी करा आणि ₹1499 मध्ये ₹7295 किंमतीचा एअर फ्रायर घरी घेऊन जा.
ह्या ऑफर्स रिलायन्स डिजिटल/ जिओ स्टोर्समध्ये 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत उपलब्ध आहेत.
 
रिलायन्स डिजिटलची माहिती
 
रिलायन्स डिजिटल हा भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आहे, ज्याचे 800 हून अधिक शहरांमध्ये 640+ मोठ्या स्वरूपातील रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि 1500+ माय जिओ स्टोअर्स आहेत, जे देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांना सेवा देत आहेत, सर्वांसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे. 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ब्रँड्स आणि 5000 हून अधिक उत्पादन सर्वोत्तम किंमतीत उपलब्ध आहेत. रिलायन्स डिजिटलकडे ग्राहकांना त्यांच्या जीवनशैलीसाठी योग्य तंत्रज्ञान मिळते, मॉडेल्सचे सर्वात मोठे कलेक्शन मिळते. रिलायन्स डिजिटलमध्ये, प्रत्येक स्टोअरमधील प्रशिक्षित आणि उत्तम माहिती असलेले कर्मचारी प्रत्येक उत्पादनावरील सर्व तपशीलासह ग्राहकालाआनंदाने सल्ला देतात.
 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रिलायन्स डिजिटल त्याच्या सर्व उत्पादनांसाठी विक्रीपश्चात सेवा पुरवते. रिलायन्स resQ ही सेवा रिटेलरसाठी उपलब्ध असते. रिलायन्स डिजिटल हा भारतातील एकमेव ISO-9001 प्रमाणित इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आहे. आठवडाभर मदत करण्यासाठी उपलब्ध आहे आणि एंड-टू-एंड सोल्यूशन्स देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.सोप्या खरेदीसाठी, ग्राहक कोणत्याही रिलायन्स डिजिटल स्टोअरला भेट देऊ शकतात किंवाwww.reliancedigital.in वर लॉग ऑन करू शकतात. त्यांना इन्स्टा डिलिव्हरी मिळेल ( 3 तासांच्या आत डिलिव्हरी) किंवा जवळच्या स्टोअर्समधून पिक-अप करण्याचा पर्याय मिळेल. अधिक माहितीसाठी www.reliancedigital.in वर लॉग ऑन करा.
 
 
 
Powered By Sangraha 9.0