
ओसलो: जगभरात प्रतिष्ठेचा मानला जाणारा नोबेल शांतता पुरस्कार या वर्षी जपानच्या निहोन हिदांक्यो संघटनेला दिला जाणार आहे. हिबाकुशा म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी या शहारांवर झालेल्या अणू हल्ल्यातून बचावलेले लोक. नोबोल पुरस्काराद्वारे या लोकांचा सन्मान केला जाणार आहे. मागची अनेक दशकं, आपले हे जग अण्वस्त्रमुक्त व्हावं यासाठी ही लोकं कार्यरत आहेत.
ऑगस्ट १९४५ मध्ये जपानवर झालेल्या अणुहल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरले. युद्धामध्ये पहिल्यांदाच अण्वस्त्रांचा वापर करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये जवळपास अडीज लाख लोकं मृत्यूमुखी पडले. जी माणसं जीवंत राहिली, त्यांच्या अस्तित्वाच्या,वेदनेच्या, काहाण्या दुर्लक्षित होत्या. जागतिक पातळीवर, अण्वस्त्रांच्या विरोधात, ठिकठिकणी लोकचळवळ उभी राहिली. १९५६ साली जपानमधील हिबाकुशा मंडळांनी एकत्र येऊन, निहोन हिदांक्योया संघटनेची स्थापना केली. यामध्ये अणवस्त्रांच्या चाचणीला बळी पडलेल्या लोकांचा सुद्धा समावेश होता. हिडांक्यो या संघटनेमुळे हजारो लोकांच्या कहाण्या जगासमोर आल्या. संयुक्त राष्ट्र परिषदेसहित अनेक जागतिक संघटनांना निवेदने दिली. शांतता परिषदांमध्ये आण्विक नि:शस्त्रीकरणाची मागणी केली. जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी अण्वस्त्रांच्या विरोधात आज सुद्धा चळवळ सुरु आहे. जपान मधील नवीन पिढी सुद्धा आता या कार्यात सहभागी होत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर, हिदांक्योच्या कामाची दखल अनेक ठिकाणी घेण्यात आली होती. त्यांच्या प्रयत्नाला यश लाभले. संयुक्त राष्ट्र परिषदेत अण्वस्त्रांच्या प्रतिबंधावरील करार सादर करण्यात आला. जगाला शांततेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरीत करत आहेत. पुढच्या वर्षी जपान वरील अणवस्त्रांच्या हल्ल्याला ८० वर्ष पूर्ण होतील. हिरोशिमा आणि नागासाकी नंतर अद्याप तरी, कुठेही इतका भीषण अणुहल्ला झालेला नाही. याचे श्रेय हिदांक्यो सारख्या संघटनेला जाते असे नोबेल समितीचे म्हणणे आहे.