केंद्राची ‘अ‍ॅग्रिस्टॅक योजना’ राज्यात राबवणार

11 Oct 2024 13:15:10

agristack
 
मुंबई : (AgriStack Scheme) केंद्राची ‘अ‍ॅग्रिस्टॅक योजना’ राज्यात राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकर्‍यांना देणे सुलभ व्हावे, याकरीता केंद्र शासनाची ‘अ‍ॅग्रिस्टॅक डिजिटल अ‍ॅग्रिकल्चर मिशन योजना’ राज्यात राबविण्यात येणार आहे.
 
या योजनेंतर्गत माहिती निर्मिती कक्ष, शेतकरी माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच आणि भू-संदर्भाकीत भू-भाग असणारे गाव, नकाशे, माहिती संच महसूल विभाग तयार करेल. यासाठी माहिती वापर कक्षाची स्थापना कृषी विभाग करेल. यासाठी सुकाणू समिती, अंमलबजावणी समिती, क्षेत्रीय स्तरावर विभागस्तरीय, जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समिती गठित करण्यात येतील. पिकांच्या माहिती संचासाठी तिन्ही हंगामात मिळून सुमारे ८१ कोटी, ८३ लाख रुपये खर्च दरवर्षी येईल.
 
 
  
 
Powered By Sangraha 9.0