मुंबई : संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समिती, महाराष्ट्र तर्फे ‘सृजन’ हे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. राजश्री तवरे, लीना अढाव, सोपान तवरे आणि प्रफुल्ला भिष्णूरकर यांची प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे संचालक संजीव गौतम यांच्या हस्ते करण्यात आले. संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री अभिजीत दादा गोखले, संस्कार भारतीचे केंद्रीय मंत्री अशोक तिवारी, ललित कला अकॅडमीचे संपादक शैलेश श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.