मुंबई : जगातला एक अत्यंत महत्वाचा पुरस्कार म्हणून नोबल पुरस्काराची ओळख आहे. दरवर्षी शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि आर्थिक विज्ञान या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना नोबल पारितोषिक दिले जाते. या वर्षीचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना जाहीर झाला आहे. दी व्हेजिटेरियन, दी व्हाइट बुक, ह्यूमन अॅक्ट्स् आणि ग्रीक लेसन इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ऐतिहासिक घटनांचे वर्णन करताना वास्तववाद, मानवी भावभावना सुद्धा त्यांनी आपल्या लिखाणातून सुंदर पद्धतीने रेखाटल्या आहेत. नोबेल समितीचे अध्यक्ष अँडर्स ऑल्सन यांनी हान यांचे अभिनंदन केले आहे. स्त्रियांची असुरक्षितता, स्त्रियांचे जीवन यांच्याबद्दल कायमच हान सक्रिय असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते म्हणाले, ‘शरीर आणि आत्मा, मृत आणि यांना जोडणाऱ्या दुव्याची विशिष्ट अशी समज त्यांना आहे. त्याची मांडणी काव्यात्मक आणि प्रयोगात्मक शैलीतून करण्याचे त्यांचे तंत्र समकालीन गद्यांमध्ये अगदी नावीन्यपूर्ण असे आहे.’