नीलमाथा मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना

11 Oct 2024 21:28:40
 
Neelmatha Temple
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊच्या (Luknow) नीलमाथा येथील मंदिरात बसवण्यात आलेली दुर्गा मातेची मूर्ती चोरट्यांनी तोडली आहे. दुर्गा मातेचे हात कापले गेल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने भाविकांनी घटनास्थळी मंदिरात धाव घेतली. याप्रकरणी परिस्थिती पाहता प्रशानाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. लोकांचा संताप पाहून पोलिसांनी अज्ञतांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
 
कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीलमाथा येथील मरीमाता मंदिरात दुर्गा मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आला. गुरूवारी १० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी मंदिराचे पुजारी पूजेसाठी पोहोचले असता त्यांना मूर्तीचा हात कापल्याचे दिसले. हल्लेखोरांनी मशीनने मूर्तीचे हात कापले. यानंतर पुजाऱ्याने स्थानिक लोकांना घटनेची माहिती दिली. यामुळे जमाव जमला आणि लोकांनी संताप व्यक्त केला होता.
 
यावेळी संतप्त झालेल्या लोकांना पोलिसांनी शांत करण्याचे काम केले. यावेळी आरोपींना ताब्यात घेतल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, लखनऊ येथील वातावरण बिघडवण्याचे काम विरोधक करत आहेत. बाजारखाला येथील मंदिराबाहेर एका महिलेने मांसांचे तुकडे फेकल्याची धक्कादायक घटना आहे. त्यानंतर मंदिरात मूर्तीचे हात कापले गेले.
 
बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी शहरातील बाजारखला पोलीस ठाणे परिसरात असलेल्या मंदिराबाहेर मांसाचा तुकडा आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले. याप्रकरणी अलीमा नावाच्या महिलेला अटक करण्यात आली.
 
Powered By Sangraha 9.0