लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

    11-Oct-2024
Total Views |
 
Ladki Bahin
 
मुंबई : राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप लाभ मिळालेला नाही त्या आता अर्ज करू शकतात. पालकमंत्री दादा भुसे यांनी याबद्दलची माहिती दिली. राज्य सरकारच्या या निर्णयाने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
हे वाचलंत का? -  मोठी बातमी! राज ठाकरे दसऱ्याला साधणार जनतेशी संवाद
 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून याद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत असंख्य महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. परंतू, काही अडचणींमुळे अद्याप ज्या महिलांना अर्ज भरता आलेला नाही त्यांना आता मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १५ ऑक्टोबरपर्यंत लाडकी बहिण योजनेसाठी महिला अर्ज करू शकतात. लवकरात लवकर अर्ज भरून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.