दुर्गामातेसमोर पोरांनी गायलं 'इस्लामी गीत'; नेटकऱ्यांचा संताप!

बांगलादेशात हिंदू सणांमध्ये गैर हिंदूंची घुसखोरी

    11-Oct-2024
Total Views |

Islamic Song in Navratri

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Islamic Song in Navratri)
नवरात्रोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात सुरु असताना जिहादी विचारांच्या लोकांकडून हिंदूंच्या सणांना गालबोट लावण्याचा प्रकार बांगलादेशात मात्र अद्यापही सुरुच आहे. बांगलादेशच्या चितगाव येथील जेएम सेन हॉलमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्यामुळे नेटकरांच्या चांगलाच संताप झालेला दिसत आहे. जमात शिबीरच्या विद्यार्थी संघटनेचा एक गट 'दुर्गा पूजा' मंडपाच्या ठिकाणी 'बांगलादेश इस्लामी चत्रो शिबीर' हे इस्लामी गीत मंचावर गाताना व्हिडिओत दिसत आहेत. सदर व्हिडिओ सकलेन कुरशिद यांनी आपल्या सोशल मिडियावर सदर व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे प्रकरण उघडकीस आले आहे.

हे वाचलंत का? : नवरात्रौत्सवात दुर्गामातेच्या मूर्तीवर दगडफेक

यापूर्वी राजशाही विभागातील पबना येथील ऋषीपारा बारवारी पूजा मंडप आणि माणिकादी पालपारा बारवारी पूजा मंडप येथे दुर्गा आणि इतर हिंदू देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. ऋषीपारा मंडपात ४ तर माणिकडी मंडपात ५ मूर्तींची विटंबना करण्यात आली होती. त्याचबरोबर इस्लामिक कट्टरपंथींना दुर्गापूजेच्या कार्यक्रमांना धमक्या दिल्या असून पुजेदरम्यान मूर्ती विसर्जन, सुट्ट्या आणि कोणतेही धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत, असे त्यांनी म्हटले होते. 'दुर्गापूजेच्या सुट्ट्या रद्द न केल्यास आणि मूर्ती विसर्जनासारखे उपक्रम थांबवले नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू', असा इशाराही 'इन्साफ कीमकारी छात्र-जनता' या इस्लामिक संघटनेकडून बांगलादेश सरकारला देण्यात आला होता.