प.पु.श्री.गोळवलकर गुरुजी स्मृती केंद्र भूमिपूजन सोहळा

11 Oct 2024 16:29:42

Rashtriya Seva Samiti

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Golwalkar Guruji Smruti Kendra)
राष्ट्रीय सेवा समिती, रत्नागिरी संचालित 'प.पु.श्री.गोळवलकर गुरुजी स्मृती ग्रामविकास प्रकल्प' गोळवली येथे सुरु असून, त्याद्वारे विविध सेवा कार्य तसेच सामाजिक कार्य सुरु आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांच्या समग्र कार्याचे तसेच विचारांचे त्यांच्या मुळ गावी स्मृती रुपात जतन व्हावे म्हणून 'प.पु.श्री. गोळवलकर गुरुजी स्मृती केंद्र' उभारण्याचे संकल्पित केले आहे. या संकल्पित स्मृती केंद्राचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यांच्यासह गोळवली ग्रामपंचायत सरपंच शालिनी पतीये, गोळवली गाव गावकर दत्ताराम दुदम यांची मुख्य उपस्थिती असेल. सदर भूमिपूजन सोहळा गुरुवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत प.पु.श्री.गोळवलकर गुरुजी स्मृती ग्रामविकास प्रकल्प गोळवली, संगमनेर, रत्नागिरी येथे संपन्न होईल.

Powered By Sangraha 9.0