संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात 'घर घर संविधान' अभियान राबवणार!

11 Oct 2024 11:49:54
 
Constitution
 
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यभरात घर घर संविधान अभियान राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबद्दलचा शासन आदेशदेखील जारी करण्यात आला आहे.
 
राज्यात २०२४-२५ या काळात संविधानाचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच यानिमित्ताने 'घर घर संविधान' या अभियानाची आखणी करण्यात आली असून अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानाबाबत जागरूकता, शिक्षण, त्यातून मूल्य संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वांचा सक्रिय सहभाग यातून साध्य केला जाणार आहे. दरम्यान, या 'घर घर संविधान' उपक्रमात सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे आणि संविधानाचा जागर करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0