पनवेल : सूत्रधार निर्मित आणि सावी फाऊंडेशन आणि सामगंध आयोजित ‘आई’ हा कथा, कविता, किस्से आणि गाण्यांमधून आईची महती सांगणारा कार्यक्रम रविवार १३ ऑक्टोबर रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना अनिल हर्डिकर यांची आहे आणि त्यांनीच कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदन केले आहे. इला भाटे यांनी या कार्यक्रमाचे सह निवेदन केले आहे. मंदार भिडे, चैत्रल पोतदार आणि आदिती प्रभुदेसाई या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहेत. अनुपमा ताकमोगे या कार्यक्रमात कथाकथन करणार आहेत. या कार्यक्रमाची तिकिटे नाट्यगृहावर उपलब्ध आहेत.