एआयचे गॉडफादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'या' दोन शास्त्रज्ञांना नोबल पुरस्कार जाहीर

11 Oct 2024 13:14:19

ai godfather 
 
मुंबई : जगातला एक अत्यंत महत्वाचा पुरस्कार म्हणून नोबेल पुरस्काराची ओळख आहे. दरवर्षी शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि आर्थिक विज्ञान या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना नोबल पारितोषिक दिले जाते. या वर्षीच्या म्हणजेच २०२४ च्या नोबल पारितोषिकांची घोषणा व्हायला ७ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली. या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार एआयचे  गॉडफादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेफ्री ई. हिंटन आणि शास्त्रज्ञ जॉन जे. होपफिल्ड यांना जाहीर करण्यात आला आहे. कृत्रिम न्यूरॉन्सवर आधारित मशीन लर्निंगशी संबंधित नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नोबेल पारितोषिकाची घोषणा करताना समितीने म्हटले आहे की, या दोन्ही शास्त्रज्ञांनी जगाला नव्या पद्धतीने संगणक वापरायला शिकवले आहे.
Powered By Sangraha 9.0