“ज्यांनी फक्त कंपनी नाही, तर संस्कृती उभी केली”, रतन टाटांच्या निधनाने हळहळले मराठी कलाकार

    10-Oct-2024
Total Views |

ratan tata  
 
मुंबई : देशाचे दिग्गज उद्योगपती आणि टाटा सन्सचे चेअरमन रतन नवल टाटा यांचे वयाच्या ८६व्या वर्षी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री उशीरा निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून विविध क्षेत्रातील मंडळी शोक व्यक्त करत आहेत. अगदी सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेते, कलाकार, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू देखील आपल्या सोशल मिडियावरुन रतन टाटा यांना भावपूर्ण आदरांजली वाहात आहेत.
 
मराठी मनोरंजनसृष्टीतील लेखक क्षितीज पटवर्धन यांनी देखील भावूक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'रतन टाटा सर. ज्यांनी फक्त कंपनी नाही, तर संस्कृती उभी केली. फक्त मालाची विक्री नाही, मूल्यांची बांधणी केली. पिढ्यांना रोजगारच नाही, तर अगणित स्वप्न दिली. फक्त कंपनीला नाव नाही, तर देशाला किर्ती दिली.' क्षितीजने ही पोस्ट शेअर करताना असे कॅप्शन दिले की, 'तुमच्या वैचारिक श्रीमंतीला आणि भौतिक साधेपणाला, तेजःपुंज व्यक्तिमत्वाला आणि लखलखीत कारकिर्दीला... विनम्र अभिवादन.'
 

patwardhan   
 
तर अभिनेते प्रसाद ओक यांनी देखील इन्स्टाग्राम स्टोरीवरुन रतन टाटा यांना भावूपूर्ण आदरांजली वाहिती आहे.
 

prasad oak  
 
 
तसेच, सुबोध भावे यांनी देखील रतन टाटा यांना भावपूर्ण आदरांजली असे लिहिच स्टोरी पोस्ट केली आहे.
 

subodh bhave