महाराष्ट्रभर होणार विशेष मुलांचा ‘यहा के हम सिकंदर’ महोत्सव

01 Oct 2024 14:04:34


बालरंगभूमी परिषद  

मुंबई : महाराष्ट्रभर बालकलावंतांच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असणारी अखिल भारतीय नाट्य परिषदेची घटक संस्था असणारी बालरंगभूमी परिषद बालकलावंतांना रंगमंच उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील विशेष, दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बालरंगभूमी ‘यहा के हम सिकंदर’ हा विशेष मुलांचा सांस्कृतिक महोत्सव महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भातील पत्रकार परिषद बुधवार २ ऑक्टोबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरातील ‘जयश्री व जयवंत साळगांवकर प्रायोगिक मंच’ येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0