मुंबई : नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये नऊ रंग परिधान करण्याचा ट्रेंड असतो. या नऊ रंगाना धार्मिकदृष्ट्या सुद्धा नवरात्रीमध्ये महत्व असते असे मानले जाते. महिलांमध्ये या नऊ दिवशी ठराविक नऊ रंग परिधान करण्याचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे नवरात्रीमध्ये या नऊ रंगांच्या कपड्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात केली जाते. या वर्षीचे नवरात्रीतील नऊ रंग खालीलप्रमाणे आहेत.
३ ऑक्टोबर (पहिला दिवस) – पिवळा
४ ऑक्टोबर (दूसरा दिवस) – हिरवा
५ ऑक्टोबर (तिसरा दिवस) - राखाडी
६ ऑक्टोबर (चौथा दिवस) - नारंगी
७ ऑक्टोबर (पाचवा दिवस) – पांढरा
८ ऑक्टोबर (सहावा दिवस) – लाल
९ ऑक्टोबर (सातवा दिवस) – निळा
१० ऑक्टोबर (आठवा दिवस) – गुलाबी
११ ऑक्टोबर (नववा दिवस) – जांभळा