मुलुंड : महाराष्ट्र सेवा संघ तर्फे ‘तपस्विनी’ या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मुलुंडचा ऑलिंपिक प्रवास’ या सोहळ्यात उलगडणार आहे. मुलुंड रहिवासी असणाऱ्या भारतीय ऑलिंपिक चमूच्या क्रीडा पोषणतज्ञ मीहिरा खोपकर आणि राष्ट्रीय नेमबाजी संघ प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांच्याशी या सन्मान सोहळ्यात संवाद साधला जाणार आहे. आहार आणि स्वास्थ विशेषज्ञ डॉ. नितीन पाटणकर आणि क्रीडा पत्रकार पराग फाटक त्यांच्याशी हा संवाद साधणार आहे. माजी राज्यसभा खासदार आणि पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ञ डॉ. विकास महात्मे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा सन्मान सोहळा बुधवार २ ऑक्टोबर रोजी मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघाच्या सु. ल. गद्रे सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.