गोळी लागल्यावर गोविंदा यांची पहिली प्रतिक्रिया;"गोळी लागली पण डॉक्टरांमुळे..."

01 Oct 2024 11:45:08

Govinda  
 
 
मुंबई : अभिनेते गोविंदा यांना आज १ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे त्यांच्या घरी परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागली. अनावधानाने पायाला गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
 
गोविंदा यांना गोळी लागल्यानंतर त्यांनी एका ऑडियो मेसेजमधून त्यांच्या प्रकृतीबद्दल स्वत:च माहिती दिली आहे. गोविंदा म्हणाले की, ““नमस्कार, मी गोविंदा.. तुम्हा सर्वांच्या आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी सुखरुप आहे. मला पायाला गोळी लागली होती, पण ती काढण्यात आली आहे. मी येथील डॉक्टरांचे आभार मानतो. प्रार्थनासाठी तुम्हा सर्वांचेही धन्यवाद”.
 
तसेच, गोविंदा यांची मुलगी टीना आहुजा हिने इंडियन एक्सप्रेसला वडिलांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. टीना म्हणाली, “मी सध्या आयसीयूमध्ये बाबांबरोबर आहे. मी आता जास्त बोलू शकत नाही… पण त्यांची प्रकृती आता बरी आहे. गोळी लागल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्या आहेत, त्यांचे रिपोर्ट्स चांगले आहेत”.
Powered By Sangraha 9.0