मुंबई : अभिनेते आणि शिवसेना नेते गोविंदा यांना स्वत:च्याच बंदुकीतून गोळी लागून पायाला गंभीर दुखापत झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे. १ ऑक्टोबर रोजी रिव्हॉल्वरचे लॉक खुले असल्याने अभिनेते गोविंदा यांना चुकून गोळी लागली.
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्याशी संपर्क साधत प्रकृतीबद्दल विचारपूस केली. तसेच लवकर बरे होण्यासाठी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी राज्य सरकार आणि जनतेच्या वतीने सदिच्छा व्यक्त केल्या. गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याबद्दलची खात्रीही त्यांनी दिली.
हे वाचलंत का? - 'हर घर दुर्गा' अभियान देशासाठी प्रेरणादायी : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
अभिनेते गोविंदा यांना स्वत:च्याच बंदुकीतून गोळी लागून पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, या अपघातानंतर त्यांना तातडीने अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोविंदा यांच्याकडून त्यांच्याच परवानाधारक बंदुकीचा ट्रीगर अनावधानाने दाबला गेला. त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे हा अपघात झाला.