मुंबई : 'धर्मवीर २' हा चित्रपट २९ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना आवडली असून त्याची प्रचिती बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. 'धर्मवीर २ :'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची हिंदुत्वाची व्याख्या दाखवण्यात आली आहे.
'धर्मवीर २' ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'धर्मवीर २'ने अवघ्या चार दिवसात ९.२७ कोटींची कमाई केली आहे. महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालेला हा चित्रपट हाऊसफुल्ल सुरु आहे. तसेच, 'धर्मवीर २'मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हिंदुत्वासाठी आनंद दिघेंनी कसं मार्गदर्शन दिलं याची अनोखी गोष्ट दिसते.