अभिनेते गोविंदा यांना स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी

01 Oct 2024 11:25:47

govinda  
 
 
मुंबई : अभिनेते आणि शिवसेना नेते गोविंदा यांना स्वत:च्याच बंदुकीतून गोळी लागून पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आज १ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ही दुर्घटना घडली. रिव्हॉल्वरचे लॉक खुलं असल्याने चुकून गोळी लागल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या अपघातानंतर त्यांना तातडीने अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
गोविंदा यांच्याकडून त्यांच्याच परवानाधारक बंदुकीचा ट्रीगर अनावधानाने दाबला गेला आणि त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. तसेच, याप्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत. गोविंदा यांच्या मॅनेजरने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा पहाटेच एका कार्यक्रमासाठी कोलकत्याला जाणार होता. तयार होत असताना त्यांनी त्यांची लायसन्स रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवण्यासाठी हातात घेतली. मात्र ती चुकून हातातून खाली पडली. रिव्हॉल्वरचं लॉक खुलं राहिल्याने त्यांच्या पायाला गोळी लागली. त्यांना लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याचे कुटुंबीय रुग्णालयात आहेत.
 
 
 
डॉक्टरांनी गोळी काढली असून आता ते सुखरुप आहेत आणि काळजी करण्याचं कारण नाही अशी माहिती समोर आली आहे. गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला पतीच्या प्रकृतीबद्दल माहिती देत म्हटले आहे की त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0