वक्ता कार्यशाळेतून सावरकर विरोधाला छेद - सात्यकी सावरकर

हर घर सावरकर समितीची वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न!

    08-Jan-2024
Total Views |
Satyaki avarkar


पुणे
: स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आरोप करणारे एकेकाळी अधिक होते पण ही परिस्थिती आता बदललेली आहे. अशा कार्यशाळांमुळे सावरकर विरोधाला छेद देण्याचं काम घडेल, असे विधान पुण्यात आयोजित कार्यशाळेत सात्यकी सावरकर यांनी केले.तसेच अभ्यासपूर्ण वक्ते तयार करण्यासाठी आणि गावोगावी सावरकर विचार पोहोचवण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची असल्याचे ही सात्यकी सावरकर यांनी प्रतिपादन केले.


Har Ghar Savarkar Workshop news
(कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थीं)


स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी दिनानिमित्त हर घर सावरकर समिती, विवेक व्यासपीठ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने दि.६ आणि ७ जानेवारी रोजी वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रभरातून ८० प्रशिक्षणार्थी पुण्यात सावरकर अध्यासनात '' हा विषय समजून घेण्यासाठी आले होते. यावेळी सावरकर कार्याचा प्रचार,प्रसारासाठी समितीकडून १० प्रशिक्षणार्थींचे विशेष पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. यासह ८० प्रशिक्षणार्थींनी सावरकरांच्या विविध पैलूवरती आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाचे सादरीकरण केले. या भाषणाचे परीक्षण डॉ. कल्याणी हार्डीकर, भाग्यश्री हर्षे, अंजली कर्वे, दिलीप पुरोहित, प्रिया साबडे-कुलकर्णी, स्नेहल लिमये, वृंदा नाईक, संजय वैशंपायन, विलास सावरिकर , सुरेश आबादे यांनी केले. या मान्यवर परीक्षकांच्या निवडीचे आणि नियोजनाची जबाबदारी विद्याधर नारगोलकर यांनी पार पाडली.

यावेळी समितीचे विद्याधर नारगोळकर ,यशवंत अकोलकर ,रोहन अंबिके, प्रशांत चव्हाण, देवव्रत बापट, अश्विनी कुलकर्णी, निखिल कुलकर्णी, ॲड. गौरी कुलकर्णी हे देखील उपस्थित होते. तरी कार्यशाळेच्या सांगता समारंभात सात्यकी सावरकर, आमदार विजय शिवतारे, रवींद्र साठे, माजी खासदार प्रदीपदादा रावते, सावरकर अभ्यासक अक्षय जोग, नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी बालकिर्तनकार अग्रणी साठे हीने सावरकर विचारांवर किर्तनाची एक झलक सादर केली. त्याचबरोबर शालेय विद्यार्थी मुकुंद धर्मावत आणि निनाद गोखले यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत सावरकर विचार मांडले.

विशेष पारितोषिकासाठी निवडक वक्ते

सचिन करडे, चिन्मय टिळक, सुप्रिम मस्कर, प्रांजल अक्कलकोटकर, अन्वी जाधव, भागवत मस्के, सीमा पाटील, सुप्रिया गव्हाणे, यश वैद्य, राजेंद्र सवाईकर ह्यांना विशेष पारितोषिकाने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सावरकर विचार घराघरात पोहोचवणे हे आज काळाची गरज आहे आणि त्यासाठी महायुती सरकार काम करत आहे हे कौतुकास्पद आहे. नवीन पिढी घडवण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वाची वाटते. हिंदुत्व टिकलं तर देश टिकेल आणि देश टिकला तर जग टिकेल. त्यामुळे सावरकरांचे विचार पोहोचवणे यापेक्षा ते रक्तात घुसवण्याचं काम इथल्या प्रशिक्षणार्थ्यांनी गावोगावी करावे.- विजय शिवतारे, माजी आमदार


हिंदू प्रबोधन युगाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे राजकीय दृष्टीने हिंदुत्व विकसित करायला हवे. वर्तमान सक्षम बनवण्यासाठी हे वक्ता प्रशिक्षणाचे सावरकर समितीचे कार्य महत्त्वाचे.- प्रदिपदादा रावत, माजी खासदार

सावरकरांचा विचार सर्वत्र पोहोचवण्यासाठी 'सावरकर दर्शन प्रतिष्ठान' हर घर सावरकर समितीसह नेहमी कार्यरत राहील. या कार्यशाळेत सावरकर विषय मांडणारे वक्ते पुढे नावारूपाला येतील आणि विचारांचे वारसदार होतील. तेव्हाच सावरकर घरापर्यंत पोहोचतील आणि सावरकर विचारांचा विजय होईल.- रवींद्र साठे ( खादी ग्रामोद्योग महामंडळाचे चेअरमन, राज्यमंत्री दर्जा)

सावरकर विचार योग्य पद्धतीने पोहोचवणार आणि सावरकरांच्या विचारांचा प्रसार प्रसार करावा या प्रशिक्षणार्थींकडून अपेक्षा आहे. मुळात सावरकरांचा विचार पटवण्याचा काळ आता गेलेला आहे , त्यामुळे आता सावरकरांचे विचारांनी प्रत्येकाला पेटवायला हवे.- विद्याधर नारगोलकर (हर घर सावरकर समिती)

सावरकर विचार पोहोचवणारे वक्ते घडवण्यासाठी ही कार्यशाळा आहे. हेच वक्ते उद्या हजारो वक्ते आणि अभ्यासक घडवतील यात शंका नाही.-केदार बापट , स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान

सावरकरांचे साहित्य विचार आणि कार्य महाराष्ट्रातील किंबहुना देशातील प्रत्येक राज्यात पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. यासाठी महाराष्ट्र शासनाचे अमूल्य योगदान आम्हाला लाभले.- अनंत पणशीकर,( ज्येष्ठ नाट्य निर्माते आणि हरघर सावरकर समितीचे सदस्य)




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.