रोहित पवार अजून बच्चा आहे! त्याला माझे कार्यकर्ते उत्तर देतील : अजित पवार

06 Jan 2024 17:58:15

Rohit Pawar & Ajit Pawar


मुंबई :
रोहित पवार अजून बच्चा आहे त्याला माझे कार्यकर्ते उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शनिवारी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बारामती ॲग्रो गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या सहा ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली.
 
"आम्ही ईडीला सगळे कागदपत्रे दिलेली आहेत. मी खरंच चुक केली असती तर भारताबाहेर असताना मी परत आलो नसतो. तसेच चुक केली असती तर मी अजितदादांबरोबर जाऊन बसलो असतो," असे रोहित पवार म्हणाले होते. याबद्दल अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, "रोहित पवार अजून बच्चा त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला मी उत्तरं द्यावी एवढा तो मोठा झालेला नाही. माझे कार्यकर्त, प्रवक्ते त्याला उत्तर देतील," असेही ते म्हणाले आहेत.

Powered By Sangraha 9.0