पाहा: राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर विराजमान हनुमान, गज आणि सिंह यांच्या मूर्ती

05 Jan 2024 13:55:18
ram mandir
 
लखनौ : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदीर उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सूरू आहे. भव्य मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमीत्ताने देशभरात उत्साहाच वातावरण आहे. राममंदिराच्या मुख्यद्वारावर अनेक मूर्त्या बसवण्यात आल्या आहेत.
 
 
 
ram mandir 1
 
राममंदिराचे मुख्य प्रवेशद्वार सिंहद्वारावर सिंह, हत्ती, गरुड, व हनूमानजी यांच्या मुर्ती बसवण्यात आल्या आहेत. या मुर्ती राजस्थान येथील गाव बंसी पहाडपुर येथे आढणाऱ्या हलक्या गुलाबी रंगाच्या दगडापासुन बनवण्यात आल्या आहेत. या दगडाला बलूआ दगड असे म्हटले जाते.
 
ram mandir 2
 
राममंदिराच्या मुख्यद्वाराच्या माध्यमातून मंदिरात प्रवेश करण्यासाठी ३२ पायऱ्यांच्या मदतीने वर जावे लागते. त्या पायऱ्यांवर या सुबक मुर्ती बसवण्यात आल्या आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0