मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय-२०२४’ अंतर्गत चार दिवसांच्या मुंबई लोकसभा मतदारसंघ प्रवासाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवार, दि. ०५ जानेवारी २०२४ रोजी ते उत्तर मुंबई लोकसभा, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा आणि दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील एकूण नऊ विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
या प्रवासात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
• सकाळी ११.०० वाजता कांदिवली पश्चिम येथील ठठाई भाटिया हॉल, स्वामी विवेकानंद मार्ग येथे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील चारकोप, मागाठाणे, आणि मलाड(प.) विधानसभा मतदारसंघ विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
• दुपारी ०३.०० वा. माटुंगा येथील पायोनियर हॉल भाउदाजी रोड येथे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सायन-कोळीवाडा, वडाळा आणि माहिम विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
• सायं. ०६.०० वा. गावदेवी येथील शारदा मंदिर स्कूल, हरिश्चंद्र गोरेगाव मार्ग येथे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील कुलाबा, मुंबादेवी आणि मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष तसेच कुलाबाचे आ. राहुल नार्वेकर, राज्याचे कौशल्य विकास मंत्री तसेच मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा, खा. गोपाळ शेट्टी, मुंबई उत्तर लोकसभा समन्वयक व चारकोपचे आ. योगेश सागर, सायन कोळीवाडाचे आ. कॅप्टन आर. तमिल सेल्वन, वडाळाचे आ. कालिदास कोळंबकर, मुंबई दक्षीण मध्य लोकसभा समन्वयक आ. प्रसाद लाड, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, मुंबई उत्तर जिल्हाध्यक्ष गणेश खनकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, सुहास अडिवरेवर व राजेश सिंग यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.