जितेंद्र आव्हाडला पुण्यात फिरू देणार नाही : धीरज घाटे

04 Jan 2024 17:45:46

BJP Pune


पुणे :
'संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सडक्या बुद्धीचे केविलवाणे प्रदर्शन केले आहे. सातत्याने हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्ये करून हिंदूंच्या भावना भडकावून राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला आम्ही पुण्यात फिरू देणार नाही' असा कडक इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला.
 
बुधवारी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) चिंतन शिबीर झाले. त्यावेळी बोलताना आमदार आव्हाड यांनी 'श्री राम हे मासांहारी होते' असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर गुरुवारी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आंदोलन करून त्यांचा निषेध करण्यात आला.
 
याविषयी बोलताना घाटे पुढे म्हणाले की, "येत्या २२ जानेवारीला प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्येत लोकार्पित होत असताना या धर्मांध आमदाराने वक्तव्य करून संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. भारतीय जनता पार्टी याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे.
 
या आंदोलनाला घाटे यांच्यासह कॅन्टोमेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस, सुशील मेंगडे,सरचिटणीस पुनीत जोशी,रवींद्र साळेगावकर, सुभाष जंगले, राजेंद्र शिळीमकर ,राघवेंद्र मानकर, राहुल भंडारे, वर्षा तापकीर, करण मिसाळ, हर्षदा फरांदे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Powered By Sangraha 9.0