आव्हाडांना आदित्य ठाकरेंनीही सुनावलं, "महत्वाचे विषय असताना..."

04 Jan 2024 17:03:40

 Jitendra Awhad & Aditya Thackeray


मुंबई :
इतर महत्वाचे विषय असताना देव देवतांवर वाद होणं अपेक्षित नाही, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. दरम्यान, त्यांच्या विरोधात संपुर्ण राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. यातच आता आदित्य ठाकरेंनीही त्यांना सुनावलं आहे.
 
आदित्य ठाकरे म्हणाले की, "खरंतर असे वाद व्हायलाच नकोत. प्रभु श्रीराम असो किंवा कोणतेही देव-देवता असो त्यांच्यावरून वाद होणं अपेक्षित नाही. आपण भुतकाळात झालेल्या गोष्टींवर वाद करणार बसणार आहोत की, भविष्यात लढणार आहोत. आज आपल्या जाती धर्मात वाद निर्माण झालेले आहेत, पण आपण भुतकाळावर भांडत आहोत. मात्र, कुणीही भविष्याबद्दल बोलत नाही," असेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0