मंदिरं ही हिंदूंची श्रद्धास्थानं आहेत! पिकनिक स्पॉट नव्हे! हायकोर्टानं स्टॅलिन सरकारला फटकारलं

31 Jan 2024 11:38:54
 madras high court
 
चेन्नई : "हिंदू मंदिरे फक्त हिंदूंची आहेत. हिंदूंच्या मंदिरात गैर-हिंदूंचा काय काम?" अशी ठिपणी करत मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला पलानी मंदिराच्या प्रवेशद्वारावर गैर-हिंदूंना प्रवेश नाही, अशा आशयाचे फलक लावण्याचा सूचना केल्या आहेत. जर गैर- हिंदूंना मंदिरात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला मंदिराचा विहित ड्रेस कोडचे पालन करावे लागेल. त्यासोबतच त्याला आपली देवावर श्रद्धा आहे, असे प्रतिज्ञापत्र सुद्धा द्यावे लागणार आहे.
 
मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मंदिरे घटनेच्या कलम १५ अंतर्गत येत नाहीत. त्यामुळे कोणत्याही मंदिरात गैर-हिंदूंचा प्रवेश रोखणे चुकीचे म्हणता येणार नाही. एवढेच नाही तर प्रथा आणि प्रथांनुसार मंदिराची देखभाल करण्याचे निर्देशही न्यायालयाने अधिकाऱ्यांना दिले. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एस स्मृती म्हणाल्या की, मंदिर हे पर्यटनस्थळाचे पिकनिक स्पॉट नाही. जर एखाद्याला मंदिराची इमारत पहायची असेल, तर तो मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच पाहू शकतो किंवा या लोकांचा प्रवेश ध्वजस्तंभापर्यंत म्हणजेच 'कोडीमारन'पर्यंत मर्यादित असावा.
 
तथापि, जेव्हा अधिकाऱ्यांनी सुचवले की देवतेवर श्रद्धा असलेल्या आणि हिंदू धर्मात पाळल्या जाणाऱ्या चालीरीती आणि प्रथा स्वीकारणाऱ्या गैर-हिंदूंना प्रवेश द्यावा. यानंतर, मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिरात पाळल्या जाणाऱ्या प्रथेची न्यायालयाने दखल घेतली आणि अधिकारी तसे करू शकतात, असे निर्देश दिले. अशा व्यक्तींकडून शपथपत्र घ्या आणि अशा व्यक्तींना मंदिरात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची नोंद रजिस्टरमध्ये करा. असा आदेश न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0